सामाजिक भान बाळगून प्रत्यकाने सामाजिक कर्तव्य निभवावे : डॉ. वैद्य
कामगार आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 102 रिक्षा रुग्णवाहिका म्हणुन कार्यरत असणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ससून रूग्णालयासमोर या उपक्रमाचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
या उपक्रमाबाबत बोलतांना वैद्य म्हणाले, आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमान सुरु करण्यात आलेला 102 रिक्षा रुग्णवाहिकेचा उपक्रम 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन ते संपूर्ण लॉकडाऊन 24 तास मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाग्रस्त जनतेच्या असाहाय्यतेचा फायदा उठवत जेंव्हा कोणी रुग्णवाहिकांचा तर कोणी औषधांचा बाजार मांडला तेंव्हा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे हे कोविड योद्धे रिक्षा चालक निर्भयपणे जनतेच्या सेवेसाठी उभे राहिले. या संकटातून देशाला दोनच गोष्टी वाचवतील, एक निरपेक्ष मानवता आणि दुसरे राजकीय परिवर्तन.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे म्हणाले, ‘आरोग्य सेनेने आमच्या खांद्याला खांदा भिडवल्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी सुरु केलेली ही अभिनव सेवा खूप मोठे स्वरूप घेवू शकली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्याचा आमचा दोन्ही संघटनांचा मानस आहे.
Source – Tarun Bharat