Arogya Sena’s Aasam Floods Medical Relief Mission 2022

 

आरोग्य सेनेच्या आसाम पूरग्रस्त वैद्यकीय मदत पथकाचे बजाली जिल्ह्यातील  ३००० रुग्णांवर उपचार – ओलांडला २ लाख आपत्तीग्रस्तांना मदतीचा टप्पा, आजवर एक कोटी रुपयांच्या औषधांचे वाटप.  

१९ जुलै २०२२

आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या नेतृत्वाखाली गेलेले आसाम पूरग्रस्त वैद्यकीय मदत पथक बजाली जिल्ह्यातील एकूण सहा गावांमधील ३००० रुग्णांवर उपचार करून नुकतेच परतले. या पथकाने मेढिकुच्ची, कलबरी, पुबाती, अजास्तर, नहाटी आणि डंगरपार या पुराचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन या रुग्णांवर उपचार केले. या वैद्यकीय उपचार शिबिरांमध्ये ४० प्रकारच्या सुमारे २ लाख रुपये किंमतीच्या औषधांचे वाटप करण्यात आले. किमान ३०० रुग्णांची रक्तशर्करा आणि २००० रुग्णांचा रक्तदाब तपासण्यात आला. या रुग्णांमध्ये श्वसनाचे आजार, ताप-सर्दी-खोकला, त्वचेचे  फंगल संसर्ग, अॅलर्जी, जखमा, मुका मार, जुलाब-उलट्या, पित्ताचे विकार, संधीवात हे आजार प्रामुख्याने आढळले. ही सर्व गावे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची असूनही या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि थायरॉईड या आजारांचे प्रमाण अनपेक्षितपणे खूप सापडले. या सर्व रुग्णांची काळजीपूर्वक शारीरिक तपासणी करून पथकातील डॉक्टर्सनी त्यांना मार्गदर्शन करून गरजेची सर्व औषधे दिली. क्रॉनिक आजार असणाऱ्या सर्व रुग्णांना किमान एक महिन्याची औषधे देण्यात आली. ही सर्व गावे नुकतीच पुराच्या तडाख्यातून सावरत असताना त्यांच्या दारात उच्च वैद्यकीय उपचार देणारे हे पहिलेच पथक होते. आरोग्य सेनेच्या पथकाने दिवसाकाठी किमान १४ तास अविरत, विश्रांती वा जेवणासाठी न थांबता हे काम पार पाडले. ही सर्व शिबिरे स्थानिक शाळेत कधी पडवीत तर कधी उघड्यावर घ्यावी लागली.

या मोहिमेमुळे आरोग्य सेनेने आपत्ती काळात उपचार आणि मदत केलेले रुग्ण आणि गरजू यांचा २ लाखांचा आणि दिलेल्या औषधांचा १ कोटी रुपयांचा टप्पा पार पाडला. आरोग्य सेनेचे हे सर्व उपचार आणि मदत संपूर्ण मोफत केली जाते. आरोग्य सेना कोणत्याही सरकारी वा आंतराष्ट्रीय मदतीशिवाय स्वबळावर काम करते.

आरोग्य सेनेच्या १० सदस्यांच्या पथकातील सदस्य पुढील प्रमाणे: डॉ. अभिजित वैद्य, डॉ. नितीन केतकर, डॉ. धनंजय देशमुख, प्रा. प्रमोद दळवी, अॅड. संतोष म्हस्के, हनुमंत बहिरट, शरद बेनुस्कर, अॅड. केतन जाधव, आनंद चव्हाण आणि दिग्विजय थोरात. या पथकातील सर्व सैनिक हे आरोग्य सेनेचे आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय मदत कार्य हे प्रशिक्षण घेतलेले आहेत.

आरोग्य सेनेच्या या वैद्यकीय शिबिरांचे संपूर्ण व्यवस्थापन हे राकेश चक्रबर्ती (सरचिटणीस, आसाम युथ काँग्रेस), सुब्रत तालुकदार (आमंत्रक, यंग आसाम संघटना), भार्गव तालुकदार, राजश्री चौधरी, कुलोजित तालुकदार, हेमांगा तालुकदार आणि गोकुळ तालुकदार यांनी अत्यंत चोखपणे केले. हे सर्व स्थानिक युवा नेते आणि कार्यकर्ते आरोग्य सेनेच्या पथकाबरोबर तर सतत होतेच पण त्यांनी दुभाष्याची भूमिकाही बजावली. या सर्वांच्या निष्ठावान आणि नि:स्वार्थ सेवाभावी वृत्तीमुळे आरोग्य सेनेचे हे पथक इतक्या अंतर्गत भागात पोहोचून उपचार करू शकले.

आरोग्य सेनेच्या वैद्यकीय पथकाची तयारी पुढील सैनिकांनी केली: लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगांवकर, वर्षं गुप्ते, अतुल रुणवाल, डॉ. पंडीत बोबडे, वरदेंद्र कट्टी, रमाकांत सोनवणी, संतोष जाधव, संध्या बहिरट, राजश्री दळवी, प्रकाश हगवणे, डॉ. तन्वी दळवी, निलेश साळुंखे, अश्विनी ठोंबरे, स्मिता द्रविड, सिद्धांत रायचुरकर, चंद्रकांत कांबळे, महेंद्र बनसोडे इ.

We appeal to all to donate to this noble mission. Donations can be given in the name of

Arogya Sena, Bank of Baroda, Subhash Nagar, Pune IFSC BARB0SUBHAS (plz remember it is zero) Savings Account no 07910100006583
Contact Office : Sanas Plaza, Bajirao Rd, Pune 411002 Tel 9011059060/ 020 24473028/Laxmikant Mundada 9422307473

Arogya Sena is the main activity of S.M.Joshi Memorial Medical Association, a registered public charitable trust. Those who want to donate through CSR or so can also give donations in the name of S.M.Joshi Memorial Medical Association

Savings Account No 07910100005267
Bank of Baroda, Subhash Nagar, Pune Branch
IFSC Code BARB0SUBHAS
(Plz remember it is zero)

All the donations are exempt from IT under 80G.

Share This Post