मनुष्य समाज आणि पर्यावरणाच्या सकारत्मक भविष्यासाठी व्यापक दृष्टीकोनाचे नियतकालिक.
‘पुरोगामी जनगर्जना’ हे नियतकालिक पुण्यातून मार्च २०१५ पासून प्रकाशित केले जाते. या मासिकाचे संपादक डॉ. अभिजित वैद्य आहेत. डॉ. वैद्य हे ‘आरोग्य सेने’चे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख, ‘राष्ट्र सेवा दला’चे, कार्यकारी विश्वस्त आणी ‘सोशलिस्ट युवजन सभे’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
‘पुरोगामी जनगर्जना’ विषयी थोडक्यात: वैयक्तिक, सामाजिक, सार्वजनिक, राजकीय आरोग्य या बरोबरच हे मासिक पर्यावरण, विकास, जागतिकीकरण, महिला, जात, धर्म, संस्कृती इत्यादी प्रश्न आणि त्यांची उकल… तसेच सामाजिक संस्था, चळवळी, पुरोगामी विचारधारा यांनी एकत्र यावे यासाठीचे प्रयत्न आणि कल्पना…या सारख्या इतर विषयांवर भाष्य करते. इतर लेखांबरोबर वाचन संस्कृती आणि समाज, चित्रपटाचे रसग्रहण कसे करावे, कला आणि समाज… असे निराळ्या प्रकारचे सामाजिक आशय असलेले लेख हे नियतकालिक प्रसिद्ध करते.
‘पुरोगामी जनगर्जने’तून मांडले जाणारे नाविन्यपूर्ण विषय, नवीन लेखक आणि व्यापक दृष्टीकोन हेच या मासिकाचे वैशिष्ठ्य ठरले आहे.
आज सर्व विषयांवरील माहितीची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. मात्र त्यातले सत्य काय आणि त्याचा विषयानरूप मतितार्थ काय हे विश्लेषणाद्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम हे नियतकालिक करेल. शोधातून बोध हा मासिकाचा गाभा राहील.
वार्षिक वर्गणीसाठी संपर्क: ९५०३७५३०४५
RNI: MAHMAR/ 2014/57536.
‘पुरोगामी जनगर्जना’ हे मासिक मालक ‘एस.एम.जोशी’ मेमोरियल मेडिकल अशोशिएशन’ या विश्वस्त संस्थेंतर्गत काम करणाऱ्या ‘आरोग्य सेना’ या संघटनेतर्फे मुद्रक व प्रकाशक डॉ. अभिजित वैद्य यांनी स्वप्ना आर्ट्स, पुणे येथून प्रसिद्ध केले